जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार देवेश सुभाष पाटील (वय 22, रा. जिजाऊनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना निमखेडी रोडावरील चंदू आण्णा नगर चौकात घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील चंदूआण्णा नगरात देवेश सुभाष पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास तो निमखेडी रस्त्याने जात होता. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या (जीजे २३, सीबी १००८) क्रमांकाच्या कारने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात देवेश हा गंभीर जखमी झाला. धडक दिल्यानंतर संशयित हा कार घेवून तेथून पसार झाला. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर देवेश पाटील याने तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहे.




