यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुचाकीचे टायर फुटल्याने झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शिरसाड येथील रहिवासी असणारे जगदीश वासुदेव अत्तरदे हे आपल्या सौभाग्यवती हेमलता अत्तरदे यांच्यासह एमएच19 एन 2433 क्रमांकाच्या बॉक्सर या दुचाकीने भुसावळकडून यावलकडे येत होते. पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे टायर अचानक फुटल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बाईक बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात जगदीश वासुदेव अत्तरदे ( वय 53, रा. शिरसाड, ता. यावल ) हे जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे ( वय 45 ) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घाताची माहिती मिळताच शहरात असलेले आमदार शिरिष चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, सांगवी खुर्द चे माजी सरपंच विकास पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली. ट्राफिकचे पोलीस हवलदार अर्शद गवळी, सहायक फौजदार असलम खान यांनी जखमी महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तर मृतदेह विकास पाटील यांच्या वाहनातून यावल रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची माहिती साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी धाव घेतली साखळी सरपंच दीपक पाटील, शिरसाड येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, माजी सदस्य गोटू साळुंके सह साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अपघातात गंभीर जखमी असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव हलवले.