अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाच्या पुढे असलेल्या हॉटेल वृंदावनच्या समोर ओव्हरटेक करण्याऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील यशवंत गायकवाड रा. धुळे हा नातेवाईकाला अमळनेर येथे सोडण्यासाठी दुचाकी (MH-18-BP-7326) ने गेला होता. त्यानंतर अमळनेरतून घरी धुळे येथे परतत असताना तालुक्यातील मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन समोर रोडवर समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव कार क्रमांक (एमएच ५४ बी ४२९) ने सुनीलच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत सुनीलचे वडील यशवंत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.