Home Cities अमळनेर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील झाडी गावाजवळील रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवार १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अभिमन्यू आत्माराम बागुल वय-३३, रा. झाडी ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवार १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते रेशन घेऊन दुचाकीने घरी जात होते. दरम्यान झाडी गावाच्या रस्त्यावरून जात असतांना कार क्रमांक (एमएच 39 एजे 3170) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अभिमन्यू बागुल यांच्या दोन्ही हातांना व पायांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान घटना घडल्यानंतर अज्ञात चालक हा कार घेऊन पसार झाला. जखमी झालेल्या दुचाकीस्वार यांना खाजगी वाहनातून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहे.


Protected Content

Play sound