चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मालेगाव ते चाळीसगाव रोडवरील साकुर फाट्याजवळ भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू दादाजी सुर्यवंशी वय २६ रा. दापुरे ता. मालेगाव जि. नाशिक असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, नंदू सुर्यवंशी हा २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव ते चाळीसगाव रस्त्याने दुचाकीने जात असतांना रस्त्यावरील साकुर फाटा ते पिलखोड गावादरम्यानच्या राजनंदिनी हॉटेलच्या रोडवर आयशर गाडी क्रमांक (एमएच २० डीटी ४७०२) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नंदू सुर्यवंशी हा जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर चालक आयशर वाहन घेवून पसार झाला होता. या घटनेबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक राठोड करीत आहे.