ट्रँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार; चालकावर गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील डिंपल पेट्रोल पंपाजवळ भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. या संदर्भात गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी टँकर चालकावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद नामदेव कोळी वय-३०, रा. वाघारी ता. जामनेर असे मयत तरुणाचे नाव आहे.

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती आशी की, विनोद कोळी हा २४ फेब्रुवारी रात्री साडेनऊ वाजता त्याची दुचाकीने वाघारी गावातील घरी जात असताना मागून येणारा टँकर क्रमांक (एमएच २८ बीए २९१६) आणि जोरदार धडक दिली. या धडकेत विनोद हा तरुण गंभीर जखमी झाला, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटने संदर्भात त्याचा भाऊ गोपाळ नामदेव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकरवरील चालक लालचंद्र यादव रा. उत्तरप्रदेश याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास महाजन करीत आहे.

Protected Content