जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील ललवाणी गोशाळेसमोर पुढे जात असलेल्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बसवरील चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयाराम फुलसिंग अच्छाले वय-३० रा. सूनसगाव ता. जामनेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, सिताराम जवानसिंग शिसोदिया वय-२९, रा. उमाळे ता. जळगाव हा तरुण त्याचा मित्र मयाराम अछाले यांच्यासोबत ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्याची दुचाकी क्रमांक (एमपी १० झेडएफ २६९५) ने जळगावकडून उमाळा गावात जात असताना रस्त्यावरील ललवाणी गोशाळेसमोर मागून येणाऱ्या बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९०८) ने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मयाराम अछाले याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला सिताराम सिसोदिया हा गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या सिताराम सिसोदिया याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत अखेर शनिवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बसवरील चालक विलास दौलत जाधव रा.पहूर ता. जामनेर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कपूर तडवी हे करीत आहे.