जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील शेती संघाच्या पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या अपघातात ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी रविवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास रंगला बारेला वय रावण्या माल जि.बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. पाळधी ता.धरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील रावल्या माल येथील रहिवाशी असलेला कैलास बारेला हा तरूण आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात वास्तव्याला होत. मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारा कैलास हा दुचाकी क्रमांक एमएच १९ ईजे ४७९२ ने जळगाव कडून किनोद गावाकडे जात असतांना रस्त्यावरील शेती संघाच्या पेट्रोलपंपाजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी थेट गटारीत आदळली. या भीषण आपघातात कैलास बारेला हा गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत चौकशी अंती अखेर रविवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.