Home क्राईम राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
26

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील आर.एल.हॉस्पीटल समोर कारने दिलेल्या धडकेत ५१ वर्षीय व्यक्ती जखमी झाले असून दुचाकीचेही नुकसान केले. याप्रकरणी मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुरूषोत्तम रत्नाकर शुक्ल (वय-५१) रा. रिंगरोड, जळगाव हे परिवारासह राहतात. गणेशोत्सव असल्याने दादावाडी येथील त्यांच्या नातेवाईकांकडून गणपतीची मुर्ती घेण्यासाठी मुलगा श्रीरंग यांच्यासोबत सोमवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी दिड वाजता दुचाकी (एमएच १९ बीएस ३९३७) ने जायला निघाले.

दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीझेड ३४८५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पुरूषोत्तम शुक्ल हे जखमी झाले. तर त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले.

याप्रकरणी मंगळवार ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश निकम करीत आहे.


Protected Content

Play sound