भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी भागात घडली. पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध खडकी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

रमेश बुग्या लावुड्या असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रमेश यांचा भाऊ गणेश यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रमेश मुंबई-पुणे रस्त्याने निघाले होते. बोपोडीतील गोपी चाळीसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार रमेश यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या रमेश यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

Protected Content