दुभाजकावर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद टोल नाक्याजवळ ताबा सुटल्याने दुचाकी थेट दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश जामसिंग पाटील वय -४१, रा. वरणगाव ता.भुसावळ असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश जामसिंग पाटील हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वरणगाव येथे वास्तव्याला होता. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुकेश पाटील हे दुचाकी क्रमांक (एमच १९ एडी २५९६) जळगावकडून भुसावळकडे जात असतांना नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असतांना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट दुभाजकावर अदाळली. यात मुकेश पाटील हा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.

Protected Content