Home क्राईम मोठी बातमी : विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा !

मोठी बातमी : विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा !

0
214


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असताना, अचानक विजेचा धक्का लागून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. या घटनेमुळे दापोरा गावावर शोककळा पसरली असून, तरुणाच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

मयत तरुणाचे नाव मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा, ता. जळगाव) असे आहे. मयूर हा शेतीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. तो आपले आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एका लहान मुलीसोबत दापोरा गावात राहत होता. कुटुंबाने काही महिन्यांपूर्वीच नवीन घराचे बांधकाम सुरू केले होते.

नेमका अपघात कसा झाला?
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मयूर हा बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. सकाळी सुमारे १० वाजता घराचे बांधकाम सुरू असताना, त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का लागला. धक्क्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना शेजारील काही तरुणांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी तातडीने धाव घेऊन मयूरला उचलले आणि उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मयूरला मृत घोषित केले.

मयूरचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. कुटुंबाचा आधारस्तंभ अचानक हिरावल्यामुळे त्याचे वडील आणि भावाने केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मयूरच्या निधनाने त्याच्या पत्नी आणि लहान मुलीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे दापोरा गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वीज सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेसंदर्भात, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound