जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकोद येथील सरपंच सरला संजय सपकाळे यांनी उपसरपंचपद भरण्यात कर्तव्य कसून केल्याने सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याचा निकाल विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी काढले आहे. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र भगवान भगत यांची निवड २०२१ साली कायदेशीर करण्यात आली होती. व वाकोद ग्रामपंचायतीचे ११ सदस्य अपात्र संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील काही अर्ज मंजूर हावून काही अर्ज अंमि निकालासाठी बाकी होते. त्यानुसार काही सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. दरम्यान उपसरपंच रविंद्र भगत यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी पदावरून अपात्र केले होते. तेव्हा पासून उपसरपंचपद रिक्त होते. नियमानुसार ३० दिवसाच्या आत उपसरंपच पदाचे रिक्तपद भरण्याचे आवश्यक असतांना सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले उपसरपंचपद भरलेले नाही. याला सरपंच सरला सपकाळे हे जबाबदार असल्याचे ठरवून अपात्र करावे असा अहवाला जिल्हा परिषेच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला. या अवहवालाचे अवलोकन केल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सरपंच सरला संजय सपकाळे यांना अपात्र करण्याचा निकाल दिला आहे. मुळ तक्रार अर्चना दिपक गायकवाड ह्या आहेत, त्यांच्यातर्फे ॲड.विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.