जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एसटी वर्कशॉप समोरील कुशन व रेक्झीनच्या गोडावूनसह बाजूची दोन दुकानांना भीषण आग लागल्याने लाखो रूपयांचा समान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारासघडली आहे. तर दुकानाच्या बाहेर लावलेली चारचाकी वाहनाचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या आगीबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
अधिक वृत्त असे की, शेख साबीर इस्लाम वय-४५, रा.सालार नगर यांचे एसटी वर्कशॉपच्या समोर कुशन व रेक्झीनचे गोडावून आहे. बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कुशन व रेक्झीनचे गोडावूनला भीषण आग लागली. त्यामुळे बाजूला असलेल्या सुधीरचंद मन्ना वय ५८ यांच्या गॅरेज आणि अशोक गुलाब महाजन या चहा विक्रेत्याच्या दुकानांना भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग मोठ्या प्रमाणावर असल्याने सहा अग्निशमन बंबाने ही आग विझविण्यात आली. या आगीत दुकानांच्या बाहेर लावण्यात आलेली चारचाकी कार क्रमांक (एमएच ०४ इएच ७०१४) याचे देखील जळून नुकसान झाले आहे. दरम्यान या ठिकाणी सहाय्यक आयुक्ता गणेश चाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, गिरीश खडके, वाहनचालक देविदास सुरवाडे ,इकबाल तडवी, महेश पाटील, भगवान पाटील, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, लेडीज फायरमन भाग्यश्री बाविस्कर, विजय पाटील, मनोज पाटील, सरदार पाटील ,जगदीश साळुंखे, पन्नालाल सोनवणे,योगेश कोल्हे, नंदकिशोर खडके, निवांत इंगळे, संजय भोईटे, संतोष तायडे, भारत छापरिया यांनी परिश्रम घेतले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.