Home क्राईम मोठी बातमी : तीन गावठी पिस्तूलासह तिघांना अटक; रामानंद नगर पोलीसांची कारवाई

मोठी बातमी : तीन गावठी पिस्तूलासह तिघांना अटक; रामानंद नगर पोलीसांची कारवाई

0
118

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रामानंद नगर पोलीसांची कारवाई करत ७५ हजार रूपये किंमतीचे तीन गावठी पिस्तूल व ३ जिवंत जप्त करण्यात आले. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंप्राळा हुडको परिसरात तीन जण गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई कारण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत संशयित आरोपी कल्पेश उर्फ प्रबुध्द गुलाब सपकाळे वय २१ रा. हुडको, गौरव समाधान सोनवणे वय २१ रा. गॉलेक्सी कॉलनी आणि लिलाधर देवीदास कोळी वय ३५ रा. हिराशिवा कॉलनी यांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ हजार रूपये किंमतीचे तीन गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल पाटील, सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, पो.ना. हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, पोलीस शिपाई जुलालसिंग परदेशी यांनी केली.


Protected Content

Play sound