Home क्राईम मोठी बातमी : दरोड्याचा डाव उधळला; हातेडजवळ ४ दरोडेखोरांना अटक

मोठी बातमी : दरोड्याचा डाव उधळला; हातेडजवळ ४ दरोडेखोरांना अटक


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील हातेड गावाजवळ असलेल्या युग पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातेड गावातील युग पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दोन दुचाकीवर आले असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने बुधवारी २८ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर आलेले संशयित आरोपी सोनू चक्कर चव्हाण वय-२५, यशवंत निराधार पवार वय-४२, धर्मा चिमण भोसले वय-४० आणि भरत निराधार पवार वय-३८ सर्व रा.जामदे ता. साक्री जि.धुळे यांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल, दोन दुचाकी तसेच लाल मिरचीची पावडर आणि पिवळ्या पट्ट्या असा एकूण ३ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून अजून काही इतर चोरीचे किंवा दरोड्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे करीत आहे.


Protected Content

Play sound