नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खर्गे हे मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाले आहे. खर्गे यांनी शशी थरुर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर थरूर यांच्या पारड्यात १ हजार ७२ मते आली.
गेल्या २५ वर्षानंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. त्यामुळे २५ वर्षानंतर गांधी कुटुंबियांबाहेरील व्यक्ती आता काँग्रेसचा अध्यक्षपदी राहणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मोठ्या जाबाबदाऱ्या संभाळावे लागणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजराथ विधानसभा निवडणूका खर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे.