मोठी बातमी : गावठी कट्टा व काडतूससह तरूणाला अटक

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील यावल रोडवर अवैधपणे गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या एकाला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील अमरसिंग बारेला वय-२८ रा. गौऱ्यापाडा पाडा ता. चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील यावल रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये संशयित आरोपी सुनील अमरसिंग बारेला हातात विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काढतोच घेऊन फिरत असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मंगळवारी ११ जून रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी सुनील बारेला याला अटक केली. त्याच्याकडून २७ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस, १५हजारांची रोकड आणि दुचाकी असा एकूण १ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मांडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील अमरसिंग बारेला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे.

Protected Content