Home क्राईम मोठी बातमी : घरफोडी करणाऱ्या चार चोरट्यांना अटक; मुद्देमाल हस्तगत

मोठी बातमी : घरफोडी करणाऱ्या चार चोरट्यांना अटक; मुद्देमाल हस्तगत


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेले बंद घर चोरट्यांनी फोडून रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटन घडली होती. मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासातच चार संशयित आरोपींना अटक करण्यात रामानंदनगर पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे हे वास्तव्यास आहेत. दि. ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. काही दिवस त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेला.

दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश माहोरे यांनी घराकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर माहोरे यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. चोरट्यांनी किरण माहोरे यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तसेच त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार संशयित आरोपींना केली अटक
चार जणांनी ही घरफोडी केल्याची माहिती मिळताच संशयित सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांच्या मुसक्या आवळल्या.

या पथकाची कारवाई
ही कारवाई रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound