Home क्राईम मोठी बातमी : बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ !

मोठी बातमी : बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ !

0
273

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।रावेर तालुक्यातील चिनावल शिवारातील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. कुंभारखेडा रोडवरील निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातील विहिरीमध्ये हा मृतदेह तरंगताना सापडला. मृताची ओळख समीर सुराज तडवी (वय ३०, रा. चिनावल) अशी झाली आहे. सुमारे सहा दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची माहिती आहे.

खून की आत्महत्या? गूढ वाढले
समीर तडवी हा ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता विहिरीत सापडला. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या, याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या घटनेची माहिती साहिल इलमोद्दिन तडवी (वय २६) यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सावदा पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound