जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वृध्द महिलेकडे ३० लाख रूपये असल्याची माहिती मिळाल्याने दोन जणांनी तिचा खून करून तिच्या मृतदेहाचा विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. स्नेहलता संजय चुंबळे वय ६०, रा. धनश्री नगर खोटे नगर जळगाव असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहेत.
याबाबत समीर संजय देशमुख वय 28 रा. धनश्री नगर खोटे नगर, जळगाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील धनश्री नगरात स्नेहलता चुंबळे या वृद्ध महिला या वास्तव्याला होत्या. दरम्यान त्यांच्याकडे ३० लाख रुपये असल्याची माहिती जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगनाथ निकम दोन्ही रा. अमळनेर यांना मिळाल्याने दोघांनी कट कारस्थान रचून वृध्द महिलाजवळील ३० लाख रूपये मिळावे या लालसापोटी त्यांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वृध्द महिलेसोबत घातपात करून जीवेठार मारून त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावण्यात आले आहे. अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.