Home Cities जळगाव मोठी बातमी : जळगावच्या महापौरपदी दीपमाला काळे तर मनोज चौधरी उपमहापौर !

मोठी बातमी : जळगावच्या महापौरपदी दीपमाला काळे तर मनोज चौधरी उपमहापौर !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिका निवडणुकीनंतर उत्सुकता लागून असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज महायुतीतर्फे नावांची घोषणा करण्यात आली आहे.

अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. यात भाजपला 46, शिवसेनेला 22 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. एका जागेवर अपक्ष तर पाच जागांवर शिवसेना-उबाठा पक्षाने बाजी मारली होती. मतमोजणीनंतर महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला हे निघाल्याने यात नेमकी कुणाला संधी मिळणार ? याबाबत उत्सुकता लागली होती. या पदासाठी प्रामुख्याने प्रभाग-12 मधून बिनविरोध निवडून आलेल्या उज्वला बेंडाळे, प्रभाग-7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला काळे आणि प्रभाग-13 मधून बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली पाटील या तिन्हींमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून आले होते. आज गिरीश महाजन यांनी या पदांची नवे जाहीर केलीत.

या पार्श्वभूमिवर, आज महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने महापौरपदासाठी दीपमाला मनोज काळे यांना संधी देण्यात आली आहे. त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांची महापौर पदावर निवड निश्चीत झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने प्रभाग- 9 मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांचा उपमहापौरपदासाठी संधी देण्यात आलेली आहे असून त्यांची निवड देखील निश्चीत झालेली आहे.

जळगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान होणार झालेले दीपमाला काळे आणि मनोज चौधरी हे दोन्ही नगरसेवक म्हणून देखील बिनविरोध निवडून आले असून त्यांची महापौर आणि उपमहापौरपदावर देखील बिनविरोध निवड होणार असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

आज निवडीचे नाव जाहीर करतांना ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनावणे, आ. मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.


Protected Content

Play sound