गोंदीया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । उधारीच्या पैशांवरून एका युवकाची निर्घृणपणे हत्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदीया शहराजवळील कुडवा परिसरात उघडकीला आला आहे. याप्रकरणात पोलीसांनी तिघा बापलेकांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपींचा शोध सुरू केला. कुडवा परिसरात मागील महिनाभरात खूनाची ही दुसरी घटना असल्याने पोलिसांमध्ये देखील खळबळ उडाली होती. पोलीसांनी तपासची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. संतोष मानकर, लोकेश मानकर, पवन मानकर, मोहित शेंडे आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
उधारीच्या पैशांवरून वाद निर्माण झाला होता. अनेकवेळा या दोघांमध्ये यांच पैशावरुन शाब्दिक चकमक देखील झाली होती. जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचा तेव्हा ईश्वर उर्फ मनीष त्याला धमकी देत होता. हाच वाद विकोपाला गेल्याने ही हत्या करण्यात आली. रागाच्या भरात आरोपी संतोष आणि त्याच्या दोन्ही मुलांसह अन्य दोन आरोपींनी मृतकावर कुऱ्हाडीने हल्ला करत निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीना ताब्यात घेतले आहे. रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.