मोठी बातमी : भरधाव ट्रकने दुचाकीस्वराला उडविले; नातेवाईकांचा आक्रोश !

साकेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच मृत्यू झाला तर सोबतचा एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी गावाजवळ घडला आहे. या घटनेमुळे साकेगावात शोककळा पसरली आहे. तुषार महेश बाऊस्कर वय -२२,रा.साकेगाव तालुका भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुती मंदिरात दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे साकेगाव येथील तुषार बाऊस्कर आणि त्याचा नातेवाईक पंकज धनराज पाटील वय-२५, याच्यासोबत शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी दुचाकीने दर्शनासाठी दोघे जण गेले होते. दरम्यान दुपारी दर्शन घेतल्यानंतर दोघेजण दुचाकीने घरी परतत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (क्राईम न्यूज) या धडकेत तुषार बाऊस्कर हा तरुण जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला पंकज पाटील हा किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान (एलटीएन)अपघाताची वृत्त साकेगावात धडकताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

तुषार बाऊस्करचे आधीच आई-वडिलांचे निधन झालेले आहे. तो आजी व काकांकडे भाऊ विनय सोबत राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content