Home Cities यावल मोठी बातमी : अतुल पाटील शिवसेना-उबाठामध्ये दाखल, मशाल चिन्हावर लढणार !

मोठी बातमी : अतुल पाटील शिवसेना-उबाठामध्ये दाखल, मशाल चिन्हावर लढणार !

0
375

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l नगरपालिका निवडणूक तोंडावर असतानाच यावल येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आपल्या सौभाग्यवतीसह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ते आणि त्यांच्या पत्नी या निवडणुकीत मशाल या चिन्हावर लढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

यावल येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे लोकसभा प्रमुख अतुल पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क मोहीम सुरू केली असून ते प्रत्येक मतदाराच्या भेटी घेत आहेत. यंदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाले असून या जागेवर त्यांच्या पत्नी छायाताई पाटील या रिंगणात उतरणार आहेत. तर स्वतः अतुल पाटील हे वार्ड क्रमांक ११ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते नेमके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार ? हे स्पष्ट झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपली भूमिका अखेर जाहीर केली आहे.

आज माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि त्यांच्या पत्नी छायाताई पाटील या दोन्ही मान्यवरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यामुळे आता ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावल शहरातील नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहणार असून नगरसेवकांच्या जागांमध्ये घटक पक्षांना स्थान देण्यात येणार असल्याचे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.


Protected Content

Play sound