मोठी बातमी : चोरीच्या ३९ दुचाकींचा शोध; शहर आणि जिल्हापेठ पोलीसांची धडाकेबाज कारवाई !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला केला आहे. यात शहर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाकडून एकुण ३९ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. यात एकुण ७ जणांना ताब्यात घेतले आहे.

1. शहर पोलीसांनी शोधल्या १९ दुचाकी हस्तगत
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहर पोलीस ठाणे आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी झाल्याचे प्रकार उघडकीला आले होते. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा चित्रा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयित आरोपी आशीफ बशीर पटेल वय -३५, रा. दहिगाव ता. यावल याला चोरीच्या दुचाकीसह चित्रा चौकातून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबूल केली आहे. त्यांनी या दुचाकी जळगाव शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा बीड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पथकात यांचा होता समावेश
यांनी केली कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकारे, पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव, सहायक फौजदार सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकूर, संतोष खवले, उमेश भंडारकर,श्री पांचाळ, प्रणय पवार यांच्यासह इतरांनी केली आहे.

2. जिल्हापेठ पोलिसांनी शोधल्या २० दुचाकी
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन रा.धानोरा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट रा.वाघळूद, अविनाश सुनील पाथरवट रा.वाघळूद, शाहरुख रमतुल्ला खाटीक रा.लक्ष्मीनगर, जळगाव सुरेश उत्तम मोरे रा.वाघळूद यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून २ रावेर येथे आहेत.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील सपोनि संतोष चव्हाण, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोना.राजेश पदमर, पोकॉ.मिलींद सोनवणे, पोकॉ.राहुल पाटील, पोकॉ.अमितकुमार मराठे, पोकॉ.प्रशांत सैदाणे, पोकॉ.नरेंद्र दिवेकर, पोकॉ.प्रविण जाधव, पोकॉ.विकास पहुरकर अशांनी केली आहे.

Protected Content