पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पोलीसांनी एकुण १२ लाख रूपये किंमतीचा १२० किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील आंबापिंपरी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती केल्याने त्या ठिकाणी आज जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी कारवाई करून सुमारे १२० किलो गांजा अंदाजे १२ लाख रूपयांचा गांजाची ओले व ताजे झाडे पोलीसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबर राहूल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी अरूण दोधू कोळी रा. आंबापिंपरी ता.पारोळा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोली निरीक्षक बबन आव्हाड, पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यातील संशयित आरोपी अरूण कोळी हा फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.