बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज खंडग्रास सूर्यग्रहणामुळे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शनामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
संत नगरी शेगाव मध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मुळे काही दर्शनामध्ये बदल करण्यात आले आहे. शेगावचे गजानन महाराज मंदिर खूल राहणार असून आज दुपारी चार वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण पाच वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. आज सूर्यग्रहण असले तरी शेगावच संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी खुल राहणार आहे. जाळीतून भक्तांना दर्शन घेता येईल अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
आज पहाटे ग्रहणाचे वेध लागले असल्याने पहाटेची काकडा आरती झाली नाही. दुपारची पूजा , षोडशोपचार पूजा , माध्याणांची आरती होणार नसल्याचे संत गजानन महाराज संस्थांनाच्या वतीने सांगण्यात आले. दिवाळी नंतर सलग सुट्या असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात मोठी उपाययोजना करण्यात आली आहे. तर एकंदरीत भुयार व गादी दर्शनाच्या मध्ये बदल करीत भाविक भक्तांना जाळीतून दर्शन घेण्याची व्यवस्था संस्थान तर्फे करण्यात आली आहे.