नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या येत्या ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ परीक्षांमध्ये सरकारकडून मोठे बदल केले जातील, असे सांगण्यात येत आहे. कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भर्ती मंडळ (आरआरबी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मधील रिक्त जागा भरण्यासाठी आता सरकार सामान्य पात्रता चाचणी घेत आहे.
केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार, ही विशेष एजेन्सी नॉन- टेक्निकल पदांवर पदवी, बारावी आणि दहावी पास असणाऱ्यांसाठी CETs घेत सुरूवात करू शकते. ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ मधील पदांसाठी सध्या कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भर्ती मंडळ (आरआरबी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने भरती केली जाते. ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ मार्फत सरकार दरवर्षी एक लाख २५ हजार जागांची भरती करते. यासाठी तब्बल दोन कोटी ५० लाख परिक्षार्थी असतात.
ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ साठी सामान्य पात्रता चाचणी लागू होण्यापूर्वी वैयक्तिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने नोटिसा बजावल्या आहेत. यात ते म्हणाले, ‘सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. परंतू सर्व परीक्षांसाठी पात्रता समान आहे. या चाचण्यांचे वेगवेगळे टप्पे असतात. यात टायर -१, टियर -२, टायर-II, कौशल्य चाचणी यासारख्या चाचण्यांचा समावेश आहे. टीयर -१ मध्ये संगणक-आधारित ऑनलाइन मल्टि-चॉइस चाचणी आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावावर जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकार या सर्व बाबींचा अभ्यास करून निर्णय घेईल.