मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून त्यांनीच आज याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली.
या संदर्भातील वृत्त असे की, आमदार एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती कधीपासूनच समोर आलेली होती. त्यांनी याबाबत आजवर संभ्रमाचे वातावरण कायम ठेवले होते. ते नेमका केव्हा प्रवेश करणार याबाबतची माहिती देखील अद्यापसमोर आली नव्हती. आज मात्र त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर समाप्त झाला आहे.
दुसरीकडे आज आमदार एकनाथराव खडसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून आज संध्याकाळी हा सोहळा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यापूर्वी त्यांची सून खासदार रक्षाताई खडसे यांनी देखील वेट अँड वाचा असे वक्तव्य केल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यात करणार असल्याचे सूचक संकेत दिले होते. त्यानुसार आज प्रत्यक्ष आमदार एकनाथराव खडसे यांनीच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.