विदर्भात भाजपला मोठा धक्का; मेघे कुटुंबातील मोठा नेता काँग्रेसमध्ये

वर्धा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते दत्ता मेघे यांचे पुतणे व वर्धा येथील मेघे विद्यापीठाचे मुख्य कारभारी डॉ. उदय मेघे यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपापेक्षा मेघे कुटुंबास मोठा धक्का समजल्या जात आहे.

काल बुधवारी या बाबत कुजबुज सूरू होती. कारण वर्धा भाजप अधिवेशन आटोपल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उदय मेघे हे काय प्रकरण आहे, अशी विचारणा केली होती. त्या नंतर मेघे यांच्या खामला येथील बंगल्यात मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यात खुद्द सागर मेघे यांनी उदय पक्ष सोडणार नाही, तसे केल्यास त्याचे आमच्या कुटुंबाशी कायमचे नाते तुटेल, असा विश्वास भाजप नेत्यांना दिला होता. मेघे कुटुंबातील सदस्य भाजप सोडतोच कसा, असा भाजप वरिष्ठांचा विश्वास राहिला.आजच्या या घडामोडीवर मेघे कुटुंबातील किंवा अन्य नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Protected Content