इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; मोठा नेता तुतारी फुंकणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. विद्यमान आमदारालाच तिकीट देण्याचा नियम महायुतीने ठरवला असल्याने इतर पक्षांच्या नेत्यांनी वेगळा पर्याय पाहण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूरच्या कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपचे मोठे नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी देखील असा निर्णय घेणार असल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content