नवी दिल्ली वृत्तसंस्था । फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने बनावट मेसेज पाठविणार्या किंवा अफवा पसरविण्यार्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, बल्क संदेश पाठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली असून व्हॉट्सअॅप व्यवसाय(Business) वापरकर्त्यांसाठी 7 डिसेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.
15 सेकंदात 100 किंवा त्याहून अधिक मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, जे व्हॉट्सअॅप व्यवसाय युजर्स नवीन अकाउंट बनवून पाच मिनिटांच्या आत बल्क मेसेज करतात त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. नवीन खाते तयार केल्याच्या 5 मिनिटांत मोठ्या प्रमाणात संदेश पाठविणे किंवा प्रविष्ट करणे यावर कारवाई केली जाईल. कंपनी ते अकाउंट्स बंदही करु शकते. तसेच, काही मिनीटात डझनभर ग्रुप तयार करणाऱ्या व्हॉट्सअॅप युजर्सवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.