अनेर नदी काठांवरील गावांमध्ये बिबट्याची दहशत

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा शिवारात बिबट्याने बकरीचा फडशा पाडल्याचे समोर आल्यानंतर अनेर नदीच्या काठांवर असणार्‍या गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील अनेर काठावरील गावातील वेळोदे ,घोडगाव ,कुसुंबा, परिसरात बिबट्याचा वावर दिसत आहे आज दि २९ रोजी बिबट्या कुसुंबा परिसरात असल्याचे पुरावाच समोर आला आहे कुसुंबा येथील एका बकरीचा फडश्या पाडला आहे प्रत्यक्षात दिसत असल्याने परिसरातील जनता भयभीत झाली आहे. कुसुंबा येथील महेंद्र पुरुषोत्तम गोसावी यांचे रस्त्यालगत शेड आहे. त्या शेडच्या बाहेर बांधलेली शेळी बिबट्याने फस्त केली. ही घटना सकाळी अकरा वाजेच्या जवळपासची आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे. मागील आठवडाभरापासून गावकर्‍यांना मादी जातीचा बिबट्या आणि त्या सोबत त्याचे दोन बछडे दिसत असल्याने परिसरात चांगलीच घबराट झाली आहे. यामुळे शेती कामाला मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी फवारणी, निंदणी , कोळपणी , करणे असे अनेक प्रकारची कामे शेतकर्‍याचे पडून आहे. मात्र बिबट्याच्या भितीमुळे शेतमजूर मागील आठ ते दहा दिवसापासून शेती कामासाठी गेले नसल्याचे चित्र आहे. वनाधिकारी लवकरात लवकर उपाययोजना करतील की नाही? की एखादयाचे जीव जाईल तेव्हाच यांना जाग येईल का ? असा संतप्त प्रश्‍न शेतकरी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

Protected Content