भुसावळात भाजपातर्फे मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सामाजिक उपक्रम

भुसावळ, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सात वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी,भुसावळ शहरातर्फे विविध परिसरातील नागरिक, व्यापारी,रिक्षाचालक बांधवांना मास्क व  सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.

 

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आज सात वर्ष पुर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधून  भारतीय जनता पार्टी,भुसावळ शहरातर्फे भारत नगर, स्व.नाटकर चौक, मामाजी टॉकीज परिसर,न्यू आंबेडकर नगर,RPD रोड, त्याच प्रमाणे गांधी पुतळा,यावल रोड अशा विविध परिसरातील नागरिक, व्यापारी,रिक्षाचालक बांधवांना मास्क व  सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर असलेल्या भाजी बाजारात भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापारी बांधव व ग्राहकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले व त्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून जनजागृती करण्यात आली.  या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहर सरचिटणीस रमाशंकरजी दुबे, संदीप सुरवाडे, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, अजय नागराणी, गिरीश महाजन, सतिश सपकाळे,नारायण रणधीर, बिसन गोहर, संजय बोचरे, कायदा आघाडीचे शहराध्यक्ष  अ‍ॅड.अभिजित मेने, अनुसुचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल तायडे यांच्या हस्ते मास्क व सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले.   याप्रसंगी  रवी दाभाडे, संतोष ठोकळ, युवा मोर्चाचे नंदकिशोर बडगुजर, नितीन नाटकर, गौरव लोणारी, लखन रणधीर, प्रशांत भट, अमित आसोदेकर, लोकेश जोशी, स्वप्निल काळे, अक्षय जाधव यांची उपस्थिती होती.

 

Protected Content