भुसावळ प्रतिनिधी । भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने उडवल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहरातील नाहाटा चौफुल्लीवर रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघानंतर वाहनचालक पसार झाला. या अपघातात भागचंद शामलाल वाधवानी (५५,रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला.
खाजगी काम करणारे भागचंद वाधवानी हे नाहाटा चौफुल्लीकडून सिंधी कॉलनीत घराकडे येत असताना बुधवारी रात्री ११-३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.या धडकेत वाधवानी यांचे डोके अवजड वाहनाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला तर सायकलीचे नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात हिरालाल शामलाल वाधवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहे.मृत वाधवानी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, चार भाऊ असा परीवार आहे. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत जीवन जगत असलेल्या वाधवानी यांच्या मृत्यूनंतर शहरातील सिंधी कॉलनीत शोककळा पसरली आहे.