Home Cities भुसावळ भुसावळात दमदार पावसाची हजेरी

भुसावळात दमदार पावसाची हजेरी

0
26

भुसावळ प्रतिनिधी । शहरासह परिसरात आज दुपारी जोरदार पावसाचे आगमन झाले असून यंदा पहिल्यांदाच परिसरात दमदार जलधारा कोसळल्या आहेत.

जून महिला संपण्याच्या मार्गावर असतांनाही शहरासह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नव्हता. या पार्श्‍वभूमिवर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. जोरदार पावसामुळे परिसरात गारवा पसरला आहे. ग्रामीण भागात अद्याप देखील पूर्णपणे पेरण्या झालेल्या नाहीत. आज झालेल्या जोरदार पावसामुळे आता परिसरातील पेरण्यांना वेग येणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा केली जात असतांना आजच्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound