भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माफ करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असे नमूद करत शहरातील एका तरूणाने जीवनयात्रा संपविल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
इंग्रजीतून सुसाईड नोट लिहत भुसावळ शहरातील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शहरात घडली आहे. आयुष निलेश राठोड (२१, गंगाराम प्लॉट) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो अॅड. पुखराज राठोड यांचा नातू तर अॅड. निलेश राठोड यांचा मुलगा होय.
पुणे येथे सीएस (कंपनी सेक्रेटरी) शिक्षण घेत असलेला आयुष निलेश राठोड हा येथे आला होता, तो येथे बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी राठोड हा दहा वाजले तरी उठला नाही म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या भावाने खिडकीचा काच फोडून आतील पडदा दूर केला असता, आयुष राठोड याने छताला दोरी बांधून गळफास घेतला होता. त्याने इंग्रजीत सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात राकेश राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी पुढील तपास करीत आहे. आयुष यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.