भुसावळ प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे यंदाही गजानन महाराज सेवा गृप संचलित गजानन गृपतर्फे सुदृढ आरोग्य व अध्यात्म याचा संदेश देत नवीन वर्षाच्या प्रथम दिनी भुसावळ ते शेगाव निशुल्क पायी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले असून यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे.
शेगाव पायी दिंडी यात्रेची सुरुवात सकाळी 7 वाजता अष्टभुजा देवी मंदिरातील आरतीने करण्यात आली. यावेळी फुलांनी सजविलेल्या रथात महाराजांची प्रतिमा ठेवली होती. तर पावली, फुगडी खेळणारे वारकरी, गजानन ब्रास बॅन्डचे वाद्य व नाचणारे घोडे सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. पालखीचे चौकाचौकात फुले उधळून भव्य स्वागत करण्यात येत असून ठिकठिकाणी चहाफराळाची व्यवस्था तसेच फटाके फोडून जल्लोष करण्यात येत होता. पालखी मध्ये ध्वजधारी विणेकरी सहीत 250 ते 300 महिला व पुरुष सहभागी होते. सदर पालखी वरणगाव, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदूरा, खामगाव असा प्रवास करत दि.4 जानेवारी रोजी शेगाव येथे पोहोचेल.
यांचे मिळाले सहकार्य
पालखीच्या यशस्वीतेसाठी राजेश पाटील, दिनेश गवळी, कौस्तूभ देवघर गुस्जी, शरद देवरे, सुनिता पाटील, दुर्गादास महाजन, अमित अग्रवाल, दिपक ब-हाटे, संतोष शेलोडे, संदीप परचुरे, पदमाकर जैन, वैधकर, सागर कोळी, पदम मेडीकल, गजानन ब्रास बॅन्ड, भुसावळ नगरपरिषद, पोलिस प्रशासन सह पत्रकार बांधव यांचे सहकार्य लाभले.