भुसावळ, प्रतिनिधी | मध्यप्रदेशातील भुसावळ विभागाच्या खंडवा स्थानकावर विना तिकीट, अयोग्य तिकिट रोखण्यासाठी आज गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी धडक तिकिट तपासणी मोहीम राबविण्यात आली.
वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणीत एकूण ३६ तिकीट तपासणीस व ७ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. यात ३४० प्रवासी अनियमितपणे असल्याचे आढळून आले. एकूण १ लाख ७३ हजार २३० रू.दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या १०७ प्रवाशांकडून ५४ हजार ४५० दंड, अनियमित प्रवास २२९ केसेसमध्ये १ लाख १५ हजार ५०० रु. तर विना बुक सामान घेऊन जाणाऱ्या ४ प्रकरणात ३ हजार २८० रुपये दंड वसुल करण्यात आला. या प्रकरणात हेमंत सावकारे, निसार खान, एन.पी.अहिरवार, पी.व्ही. ठाकूर, पी.एम.पाटील, एस.एन. चौधरी, वाय.डी.पाठक, पी.एच.पाटील, एम.के.श्रीवास्तव, ए.एम.खान, एम.के.राज, एस. पी. मालपुरे, व्ही.बी.गौतम, रंजना संसारे, अल्वीन गायकवाड व इतर तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी होते. सदर धडक मोहीम विभागात सुरूच राहणार असुन भुसावळ रेल्वे विभागाने सर्व प्रवाशांना योग्य तिकिट घेऊन प्रवास करण्याची आवाहन केले आहे.