Home क्राईम लोहमार्ग पोलिसांनी मयताच्या पार्थिवाला नातेवाईकांच्या दिले ताब्यात

लोहमार्ग पोलिसांनी मयताच्या पार्थिवाला नातेवाईकांच्या दिले ताब्यात

0
44


भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे प्रवासात मृत झालेल्या मयताचे पार्थिव लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या सुपर्द केले आहे.

नांदूर घाट तालुक्यातील बीड जिल्ह्यातील मयत सुरेश हरिदास जाधव वय ४४ यांचे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी २१:४५ वाजेला ट्रेन क्रमांक ५११८४ अप नरखेड भुसावळ पॅसिंजरच्या कोच नंबर सी.आर.०२४३० मध्ये मरण पावले होता. मयता जवळ आधार कार्ड असल्यामुळे त्याची ओळख पटली होती. यानंतर मयताचे शालक डॉ.औदूंबर नामदेवराव नाळपे (राहणार बीड) यांनी जळगाव दवाखान्यात येऊन मयताच्या ओळख पटवून मृतदेह घेऊन गेले. मयत हे शिक्षक पदावर होते.ते अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांना नोकरी वरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे ते दोन वर्षापासून घर सोडून फिरत होते. दाढी, केसलांब, भगवा शर्ट घातलेला पोशाख होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस स्टेशनला गु.र.न.१८/१९ कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास ए.एस.आय.आर.एस.उपाध्याय लोहमार्ग पोलीस भुसावळ करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound