Home Cities भुसावळ ओवीसींच्या दिल्लीतील घरावर झालेल्या हल्ल्याचा भुसावळात निषेध

ओवीसींच्या दिल्लीतील घरावर झालेल्या हल्ल्याचा भुसावळात निषेध

0
31

भुसावळ प्रतिनिधी । एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दिन ओवीसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ भुसावळ एमआयएमतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  ओवीसी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांच्या निवासस्थानी हल्ला केलेल्या हल्लेखोरांना शिक्षा देण्यात यावी, ज्या संघटनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे, त्या संघटनेची परवानगी रद्द करण्यात यावी, असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संयुक्त सचिव फिरोज शेख, शहराध्यक्ष मुजाहिद शेख, जळगाव जिल्हा संयुक्त सचिव कलीम शेख, जळगाव जिल्हा संयुक्त सचिव मेहमूद पठाण, तालुका अध्यक्ष शोएब बागवान, शहर उपाध्यक्ष निसार शेख, माजी तालुकाध्यक्ष अशरफ तडवी, नदीम शेख, इलियास पटेल, नावेद खान, शोएब खान, व अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound