भुसावळ प्रतिनिधी । शिवीगाळ व हाणामारी प्रकरणी गुन्ह्यातील फरार आरोपीस पकडण्यात भुसावळ पोलीसात यश आले. रोहित दिपक गुप्त (वय-23) रा. नसरवजी फाईल भुसावळ असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवीगाळ व हाणामारी प्रकरणी आरोपी रोहित दीपक गुप्ता भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात भाग 5, गुरनं 42/2019 भादवी 143,147,148,149, 323, 504 प्रमाणे भुसावळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. भुसावळ पोलीसांना आरोपी भुसावळात आला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीसांच्या पथकाने आरोपी रोहित गुप्ता याला शहरातील शिवाजी नगर भागात सापळा रचून ताब्यात घेतले आहे. याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार, पोउनि मनोज ठाकरे, पोलीस नाईक किशोर महाजन, पो.कॉ. विकास सातदिवे यांनी कारवाई केली.