भुसावळ प्रतिनिधी । भुसावळातील निवडणूक आखाड्यात माघारीच्या दिवशी कोण-कोण माघार घेतात याकडे शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. सोमवारी एकूण सात उमेदवारांनी माघार घेतल्याने आता रींगणात 12 उमेदवार आहेत. अपक्षांमुळे भुसावळातील आखाड्यात मात्र अपक्ष उमेदवारांमुळे आता खरी निवडणुकीची रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.
माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयाजवळ सर्वपक्षिय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. असे असतांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी पाठिंबा दिलेल्या डॉ.मधू राजेश मानवतकर या सोमवारी दुपारी अडीच ते पाऊणेतीन वाजेच्या सुमारास पती डॉ.राजेश यांच्यासह माघारीसाठी तहसीलपर्यंत आल्या मात्र याचवेळी काही उमेदवार माघार घेत असल्याने तहसील आवारात त्या थांबल्या असतानाच माजी आमदार संतोष चौधरी यांना धक्कातंत्राचा वापर करीत डॉ.मानवतकर दाम्पत्याची मनधरणी करण्यात यश मिळवल्याने हे दाम्पत्य आपल्या पावली माघारी परतले. त्यामुळे आता निवडणुकीत पुन्हा रंगत आली आहे. काँग्रेस इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे यांनाही तिकीट न मिळाल्याने ते किल्ला लढवण्याच्या तयारीत असतानाच पक्षश्रेष्ठींनी त्यांचे मन वळवल्याने त्यांनी माघार घेतली.