Home Cities भुसावळ भुसावळ : वार्ड 21 मध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने निर्मल कोठारी यांचा बिनविरोध...

भुसावळ : वार्ड 21 मध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने निर्मल कोठारी यांचा बिनविरोध विजय निश्चित

0
302

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी वार्ड क्रमांक 21 मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून, सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निर्मल ऊर्फ पिंटू कोठारी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. या अनपेक्षित बदलामुळे वार्ड 21 मध्ये निवडणूक प्रक्रिया औपचारिक ठरली आहे.

आज माघारीची अंतिम मुदत असताना वार्ड क्रमांक 21 मधील प्रमुख उमेदवार अशोक पितांबर चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, निर्मल कोठारी यांच्या पत्नी कविता निर्मल कोठारी तसेच इतर दोघांनीही माघार घेतली असून, त्यामुळे या वार्डात अन्य कोणताही उमेदवार शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, निर्मल कोठारी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे.

अशोक पितांबर चौधरी यांनी माघारीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या नेते संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीची माहिती दिली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे अधिकृतरीत्या कळवले. त्यांच्या माघारीनंतर वार्ड 21 मध्ये निवडणुकीची लढत संपुष्टात आली असून, सर्वांचे लक्ष आता कोठारी यांच्या पुढील कार्यशैलीकडे लागले आहे.

या घडामोडीमुळे वार्ड 21 मध्ये निवडणुकीचा तणाव आणि राजकीय उत्सुकता एका क्षणात शांत झाली आहे. मतदारसंघात बिनविरोध विजयानंतर कोठारी यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

 


Protected Content

Play sound