भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी ?

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा शे. सईदा शफी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपनगराध्यक्षा शे. सईदा शफी यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे दिला. पालिकेतील सत्ताधारी भाजप गटाने पाच वर्षांत पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचे नियोजन केले होते. आतापर्यंत युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरे व शे. सईदा शफी या तिघांना संधी मिळाली. यात विद्यमान उपनगराध्यक्षांनी राजीनामा देण्यासाठी विलंब केला. अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला असून यामुळे आता उपनगराध्यक्ष पदावर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार उपनगराध्यक्षपदासाठी राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, रमेश नागराणी, राजेंद्र नाटकर, निर्मल कोठारी, सोनी बारसे आदींची नावे चर्चेत असून यापैकी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content