भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे स्थानकाच्या दुचाकी पार्किंगवर काम करणार्या तरूणाला पिस्तुलच्या धाकाने खंडणी मागणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
याबाबत वृत्त असे की, रेल्वे स्थानकावरील दुचाकी पार्किंगवर काम करणार्या २२ वर्षीय युवकाला हंसराज रवींद्र खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्या यांनी धमकावले. त्याने आपल्याला दरमहा पाच हजार रूपये खंडणी द्यावी अशी मागणी या दोघांनी केली. दरम्यान, युवकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने संशयितांनी जबरीने त्याच्या खिशातून बाराशे रुपये काढून घेतले.
या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील संशयित हंसराज खरात हा भाजपचे नगरसेवक राजकुमार खरात यांचा भाऊ असून यात या दोन्ही संशयितांसोबत एका अल्पवयीनाचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.