भुसावळ । येथील श्रीराम नगरातील तरूणाच्या हत्ये प्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत वृत्त असे की, मंगळवारी रात्री श्रीराम नगर भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून झाला होता. पूर्ववैमनस्यातून विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकू हल्ला व गोळीबार करुन त्याची क्रूर हत्या झाली होती.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित अक्षय प्रकाश न्हावकर (वय २३, रा.चक्रधर नगर, भुसावळ), अभिषेक राजेश शर्मा (वय २१, रा. चमेली नगर, भुसावळ) आणि आकाश गणेश पाटील (वय २१, रा.नारायण नगर भुसावळ) यांना अटक केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या कोठडीत या प्रकरणात अजून काही आरोपींचा समावेश आहे का? या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत. पुढील तपास बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल मोरे करत आहेत.