भुसावळ प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोषभाऊ चौधरी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबईत भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी उभारण्याची मागणी सचिन चौधरी यांनी केली असता ना. अनिल देशमुख यांनी याला सकारात्मकता दर्शविली आहे.