Bhusawal News भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दरोड्याच्या तयारीत असणार्या पाच जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

शहरातील वांजोळा रोड भागात तरूणांची एक टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. यातच वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगरकडे जाणार्या भागात चोरटे असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. यानंतर तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. याप्रसंगी आरोपींनी पोलिसांशी झटापटी करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. या पाचही जणांकडे असलेली मिरची पूड, चाकू, कुर्हाड आदी असलेली सामग्री देखील जप्त करण्यात आली.

पोलीस पथकाने या कारवाईत गिरीश गोकुलसिंग जोहरी (वय २०, तिघे रा.दीनदयाळनगर, भुसावळ), विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण (वय २२, रा.सोनिच्छा वाडी, भुसावळ); सूरज अशोकराव भांगे (वय २५, रा.पापानगर, इराणीवाडा, भुसावळ), कलीम शेख सलीम शेख (वय ३२), समीर शहा उर्फ डमरू जब्बार शहा (वय २०) यांना अटक केली.
ही कारवाई भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह विजय नेरकर, जितेंद्र पाटील, शशिकांत तायडे, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, सचिन पोळ यांनी केली. या संदर्भात विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या पाचही जणांचा आधी कोणत्या कृत्यात सहभाग होता का ? याची तपासणी देखील पोलीस पथक करत आहे.


